top of page
सिनर्जी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेत दुसरी पिढी दाखल

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
मिरज : सिनर्जी हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. रवींद्र आरळी. व्यासपीठावर डॉ.ऋषिकेश आणि डॉ. रूपल आरळी, डॉ. विराज लोकुर, डॉ. सुरेश पाटील.
सिनर्जी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेत दुसरी पिढी दाखल :
मिरज, ता. 29 : पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात अल्पावधीत नावारूपास आलेल्या येथील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये दुसरी पिढी दाखल झाली आहे. अध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांचे चिरंजीव डॉ. ऋषिकेश व स्नुषा डॉ. रूपल यांनी सेवा सुरू केली आहे. डॉ. विराज लोकुर व डॉ. सुरेश पाटील यांनी दाम्पत्याचे स्वागत केले.
डॉ. आरळी म्हणाले, “कोरोना काळात रुग्णसेवेवर आधिक भर दिला. अनेकांना जीवडेअन देण्यात रुग्णालयास यश आले. त्याचबरोबरीने महाराष्ट्र, कर्नाटकच्या सर्व योजनांसह सुविधा रुग्णालयात सुरू झाल्याने माफक दरात उपचार मिळत आहेत. अल्पावधीत रुग्णालेंचा लौकिक वाढला आहे. पुढची पिढी रुग्णसेवेसाठी दाखल झाली आहे.”
दरम्यान, डॉ, ऋषिकेश नेत्रतज्ञ असून डॉ. रूपल स्त्रीरोगतज्ञ आहे. दोघेही परदेशात शिक्षण घेऊन आल्याने रुग्णांना दर्जेदार उपचार देण्याचा प्रयत्न व मानस आहे.” मुख्य कार्यकारी आधिकारी मल्लिकार्जुन सोपळ, मोहसीनखान पठाण, सपना सांगलीकर, रोहिणी कामत, पराग सत्राळकर उपस्थित होते.
Heading 1
bottom of page